Parth Pawar Land Scam:: रद्द केला व्यवहार, वाचणार पार्थ पवार? Special Report
abp majha web team | 07 Nov 2025 10:38 PM (IST)
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गंभीर आरोप झाले आहेत. ‘तो व्यवहार रद्द करण्यात आला आहे,’ असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. या प्रकरणात १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी करून आणि केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या कंपनीत पार्थ पवारांची ९९ टक्के भागीदारी असतानाही, एफआयआर मात्र एक टक्का भागीदार असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर दाखल झाल्याने विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावरही सरकारी तिजोरी लुटण्यास मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.