Pune Land Row : मोहोळ Vs धंगेकर वादानंतर Jain Boarding पुन्हा सुरू Special Report
abp majha web team | 02 Nov 2025 10:54 PM (IST)
पुण्यातील (Pune) जैन बोर्डिंग हॉस्टेल (Jain Boarding Hostel) विक्रीचा वाद अखेर संपुष्टात आला असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका थांबली आहे. 'प्रत्येक पुण्यातल्या माझ्या जैन बांधवांसाठी तो खूप आनंदाचा विषय आहे की आज ती जागा परत एकदा आली,' असं सांगत मुरलीधर मोहोळ यांनी निर्णयाचे स्वागत केले. जैन समाजाच्या तीव्र विरोधामुळे आणि राजू शेट्टी (Raju Shetty) व गुप्तिनंद महाराज यांच्या आंदोलनानंतर धर्मादाय आयुक्तांनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी जमीन विक्रीचा करार रद्द करण्याचे आदेश दिले. या ऐतिहासिक निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांच्यासोबतचा २३० कोटींचा व्यवहार रद्द झाला. १९५८ साली स्थापन झालेले हे वसतिगृह, ज्याची क्षमता २५० विद्यार्थ्यांची आहे, आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे.