Prithviraj Chavan on Delhi Election : पृथ्वीराज चव्हाणांचं विधान,काँग्रेसमध्ये नाराजी Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यायत. पण याचदरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मोठी भविष्यवाणी केलीये. आणि त्यांच्या याच वक्तव्यामुळे इंडिया आघाडीत कलगीतुरा रंगल्याचं समोर आलंय. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य पचनी पडलेलं नाही. पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले? लोकसभेत एऩडीएविरोधात बांधलेली इंडिया आघाडीची मोट सुटत चाललीये का? पाहूयात याच सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
दिल्ली विधानसभेच्या निमित्तानं तयार झालेलं राजकीय समीकरण पाहता, इंडिया आघाडीची देखील शकलं झालीयत का? असा प्रश्न उपस्थित होतो...
लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूलनं इंडिया आघाडी बाजूला ठेवून स्वतंत्र लढत दिली
पंजाब विधानसभेत देखील आपनं काँग्रेसशी हातमिळवणी टाळत स्वबळावर दिल्लीबाहेर राज्य जिंकून दाखवलं
दिल्ली विधानसभेसाठी अखिलेश यादवांच्या सपानं आपला पाठिंबा जाहीर केलाय
तर महाराष्ट्रात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका ठाकरे स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत.