Manorama Khedkar Special Report : पूजा खेडकर यांच्या मातोश्रींची मुजोरी...शेतकऱ्यांवर दादागिरी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIAS Officer Pooja Khedkar's Family, Pune : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या नावे पुणे (Pune) जिल्ह्यातील मुळशी (Mulashi) तालुक्यातील धडवली गावात स्थानिक शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करण्यात आली. मात्र जेवढी जमीन खरेदी करण्यात आली त्यापेक्षा जास्त जमिनीवर खेडकर कुटुंबाने दावा करायला सुरुवात केली. मात्र शेतकऱ्यांनी याला विरोध केला, तेव्हा पुजा खेडकर (Pooja Khedkar) यांची आई मनोरमा खेडकर यांनी चक्क पिस्तूल काढून या शेतकऱ्यांना धमकावलं. या शेतकऱ्यांनी जेव्हा पोलिसांकडे याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी देखील याची दखल घेतली नाही. त्यामुळे पुण्यात (Pune) कायद्याचं राज्य आहे की मुळशी पॅटर्न सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय.
पासलकर आणि मरगळे कुटुंबिय वडिलोपिर्जीत भात शेती कसतात
हातात पिस्तूल घेऊन धमकवणाऱ्या मनोरमा खेडकर या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई आहेत. कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. त्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आणि सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या दिलीप खेडकर यांच्या पत्नी आहेत. मुळशी तालुक्यातील धडवली गावात पासलकर आणि मरगळे कुटुंबिय वडिलोपिर्जीत भात शेती कसतात. काही महिन्यांपूर्वी पासलकर कुटुंबातील एकाला हाताशी धरून पुजा खेडकर यांच्या नावाने जमीन खरेदी करण्यात आली. त्यानंतर खेडकर कुटुंबाची अरेरावी सुरु झाली.