✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Political Mahabharat : महाराष्ट्राच्या राजकारणातलं 'महाभारत' पक्षप्रवेशाचा मुहूर्त Special Report

abp majha web team   |  08 Apr 2025 10:15 PM (IST)

आता कहाणी राजकीय महाभारताची. सध्या राज्याच्या राजकारणात आऊटगोईंगचा झपाटा असताना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज इनकमिंग पाहायला मिळालं. गुहागरच्या सहदेव बेटकर यांनी काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा दिला. सहदेव श्रीकृष्णासोबत आले आण संजय तर आहेतच, असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं. पाहूयात राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट...


 


---


 


महाभारताला अमर रचना का म्हणतात, हे आपलं राजकारण पाहून लक्षात येतं.


जेव्हा जेव्हा सधी मिळते, तेव्हा तेव्हा राजकीय नेते आपल्या कृतींना महाभारताशी जोडून ते जिवंत करत असल्याचं दिसून येतं.


संजय हे महाभारतातलं असंच एक महत्त्वाचं पात्र.


संजय उवाच, म्हणजेच संजयनं पाहिलेलं आणि धृतराष्ट्राला वर्णन करून सांगितलेला इतिवृत्तांत ही महाभारताची खासियत.


आधुनिक काळातल्या संजयला म्हणजे संजय राऊतांनाही आता पुन्हा एकदा महाभारत दिसायला सुरुवात झालीय. 


केवळ महाभारताची कथाच नव्हे, तर त्यातली पात्रंही जिवंत करायला त्यांनी सुरुवात केलीय. 


((महाभारतातली तीन पात्रं इथं उपस्थित आहेत. उद्धव म्हणजे श्रीकृष्ण. संजय आहेच.. आणि सहदेव हे फार महत्त्वाचं पात्र होतं. धर्मराजाचं अत्यंत जवळचा सहदेव होता. आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे. सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि सहदेवाच्या येण्याचं जो कुरुक्षेत्रावर सुरु झालेलं युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणातलं.))


राऊत बोलतायत त्या महाभारताचं कुरुक्षेत्र आहे कोकणातलं.


कालपर्यंत काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या सहदेव बेटकर यांनी घरवापसी करत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. 


त्यानंतर या आधुनिक सहदेवांना आधुनिक संजयनी चांगलंच मोटिवेट केलं.


मोटिवेट करताना डेडिकेट राहण्याचा आणि जोरदार ऍक्टिव्हेट होण्याचाही सल्ला दिला.


((अनेकांनी सांगितलं सहदेवांना. आता हे शेवटचं मैदान. आता मैदान बदलायचं नाही. आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा हा संपूर्ण भगवा करा. ठेकेदारांचं राज्य संपवा. सगळं जागेवर आहे. फक्त हवा आहे. हवेची दिशा बदलताना दिसते. आपण पाहा कशी दाणादाण उडते. एक गद्दार राहणार नाही औषधाला शिल्लक.))


- 
मूळ महाभारतात कौरव आणि पांडव यांच्या युद्धात कोकणातील अनेक राजांनी सहभाग घेतल्याचा उल्लेख आहे.


आधुनिक काळात मात्र आव्हान आहे ते या राजांना आपल्याकडं टिकवून ठेवण्याचं.


त्यामुळंच आधुनिक सहदेवांना आता 'पुन्हा घर सोडून न जाण्याचं' आवाहन करावं लागत असल्याचं दिसलं.


((घरात कुरबुरी होतात. पण त्यासाठी घर सोडू नका. जुने गद्दार आता सोडून गेले आहेत.))


व्हिओ -


अर्थात उद्धव ठाकरेंना दिलेली कृष्णाची उपमा सत्ताधारी नेत्यांनी मान्य करण्याची शक्यता नव्हतीच.


त्यांनी ही उपमा फक्त फेटाळूनच लावली नाही, तर त्याकडं साफ दुर्लक्ष केलं.


((कृष्णाची तुलना ही उद्धव ठाकरेंसोबत करणं हा वेढे पणा आहे
- जनता राऊतांना सिरियसली घेत नाही आम्हीही घेत नाही))



महाभारतातील या आधुनिक पात्रांमुळं साहजिकच राजकीय वर्तुळात आधुनिक अभिमन्यूच्या आठवणीही जाग्या झाल्या. 


अर्जून, सहदेव आणि संजय या पात्रांसोबत विरोधकांचा चक्रव्यूह भेदून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत यशस्वीपणे पोहोचलेल्या फडणवीसांचं निकालानंतरचं पहिलं भाषण आठवलं नसतं तरच नवल. 


बाईट - देवेंद्र फडणवीस ((निकालानंतर विधानसभा भाषणातील बाईट))
((मी आधुनिक अभिमन्यू. चक्रव्यूह भेदून दाखवला.))



- 
मूळ महाभारतात कौरव आणि पांडव अशी सरळरळ विभागणी होती.


मात्र महाराष्ट्राच्या राजकारत गेल्या काही वर्षात घडलेलं महाभारत पाहिलं तर कौरव आणि पांडवांची प्रचंड सरमिसळ झालीय. 


मात्र आजही प्रत्येकजण स्वतःला पांडव आणि त्या-त्या वेळच्या विरोधकांना कौरवांची उपमा देत असल्याचं दिसतं.


लोकशाहीत मात्र जनतारुपी श्रीकृष्ण कुणाला अर्जून ठरवून त्याच्या हाती सत्तेचं धनुष्य देणार..
आणि कुणाला दुर्योधन ठरवून त्याचं गर्वहरण करणार, हे ठरतं.


हेच तर आहे आधुनिक महाभारत.


ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Political Mahabharat : महाराष्ट्राच्या राजकारणातलं 'महाभारत' पक्षप्रवेशाचा मुहूर्त Special Report

TRENDING VIDEOS

Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?39 Minutes ago

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी2 Hour ago

Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक2 Hour ago

Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष3 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.