Gold Purchase :अक्षयतृतीयेला गजबजणारे सराफ बाजार शांत,लॉकडाऊनमुळे सराफ कट्टे ओस,बांधकाम क्षेत्र ठप्प
निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
13 May 2021 11:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : कोरोनाच्या संकटाचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर होताना दिसत आहे. लग्नाचा सीजन असेल तर साधारणपणे सोन्या-चांदीच्या भावात वाढ होते. पण कोरोनामुळे लग्नं कमी होत असल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होत आहे. रविवारच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या भावात कोणतीही वाढ झाली नाही. मुंबई आणि पुण्यामध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,920 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 45,920 रुपये इतका आहे.