Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वृक्षतोडीवरून सेनेची दुतोंडी भूमिका? कारशेडला विरोध मग कोस्टल रोडसह इतर कामांसाठी वृक्षतोडीला मंजुरी का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Oct 2020 01:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरेतील मेट्रो कारशेडला आरेत वृक्षतोड नको म्हणून विरोध करणा-या शिवसेनेनं आपल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी केल्या जाणा-या वृक्षतोडीला मात्र हिरवा कंदील दिली आहे. शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असणा-या कोस्टल रोडसाठी 600 झाडं बाधित होत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या वृक्षप्राधिकरण बैठकीत यापैकी काही झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आरे मेट्रो कारशेडबाबत एक न्याय आणि कोस्टटल रोडबाबत दुसरा न्याय अशी दुटप्पी भूमीकेवरुन शिवसेनेला विरोधकांनी कोंडीत पकडलंय.