Opposition Party VS BJP Special Report : भाजपला रोखण्यासाठी पुन्हा बैठक, राज्यातील नेते सहभागी होणार
abp majha web team
Updated at:
16 Jul 2023 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२०१४ च्या निवडणुकीत मतदार राजाने काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतलं.. आणि देशात मोदी लाट आली..सलग दोन टर्म देशात मोदींचीच जादू कायम राहिली.. ज्यामुळे विरोधकांना मात्र घाम फुटला.. महाराष्ट्राबाबात बोलायचं झालं तर गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फुटले.. आणि भाजपच्या साथीने सत्तेत आले.. याचीच भीती आता इतर विरोधी पक्षांनाही वाटू लागलीये का? असा प्रश्न उपस्थित होतोय.. कारण गेल्या काही दिवसांपासून विरोधकांची एकजूटी पहायला मिळतेय.. एनडीए विरोधात विरोधकांची एकमूठ झाल्याचं दिसतंय. आणि त्याच अनुशंगाने बैठकांचा धडाकाही सुरु आहे..पाटनातल्या बैठकीनंतर विरोधकांनी आता आणखी एका बैठकीचं आयोजन केलंय...