नऊ वर्षे आयुष्य अंधारात गेलं, कोरोना लसीमुळे सत्तरीच्या उंबरठ्यावर आजींना मिळाली गेलेली 'दृष्टी'
मनोज जयस्वाल, एबीपी माझा | 09 Jul 2021 10:31 PM (IST)
वाशिम : कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल समाजात अनेक गैरसमज आहे त्यामुळे सरकारकडून दिली जाणाऱ्या लसीकरण केंद्राकडे अनेकांनी पाठ फिरवली. मात्र काही ठिकाणी लसीकरण झालेल्या नागरिकांना सकारात्मक आणि चमत्कारिक परिणाम ही दिसायला लागले आहेत. वाशिमच्या रिसोडच्या बेंदरवाडी भागातील एका आजींची गेल्या 9 वर्षापासून गेलेली दृष्टी चक्क लस घेतल्यानंतर आली आहे.