Bhiwandi Padgha : पहलगाम ते पडघा, दहशवादाचं कनेक्शन, कोण आहे Shakib Nachan ? Special Report
पहलगाममध्ये जिहादी अतिरेक्यांनी धर्म विचारुन हिंदू पर्यटकांना गोळ्या घातल्या. त्यानंतर देशभरात हिंदू मुस्लिम दरी निर्माण होईल ही पाकिस्तान आणि जिहादी अतिरेक्यांची स्वप्न धुळीस मिळालं. मात्र ती संधी साधून देशातील जिहादी स्लीपर सेल सक्रिय होतील अशी शक्यता वर्तवली गेली होती. भिंवडीतील पडघ्याजवळ बोरिवली गावात अशा धर्मांध प्रवृत्ती वर डोकं काढताना दिसल्या. दहशतवाद विरोधी पथकाने अशा २१ ठिकाणी छापेमारी केली. साकीब नाचनसारखे बॉम्बस्फोटात शिक्षा भोगून आलेले अतिरेकी आणि त्याचे धर्मांध शागिर्द एटीएसच्या रडारवर आहेत. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
भिवंडीतील पडघ्या जवळ कुख्यात बोरवली गावात दहशतवाद विरोधी पथकाने पुन्हा कारवाई केली.
कुख्यात यासाठी की या गावात सीरियाच्या आयसिस या जिहादी संघटनेची पाळमुळं खोलवर आणि दूरवर पसरले आहेत.
या गावाने स्वत:ला अल शाम म्हणजे सीरियाचा स्वतंत्र भाग घोषित केलं होतं.
दोन वर्षांपूर्वी इथे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला सुद्धा उतरावं लागलं होतं.
मुंबईतील वेगवेगळ्या बॉम्बस्फोटात शिक्षा भोगलेला, सिमीचा कुख्यात अतिरेकी साकीब नाचन याच गावचा.
या गावात मध्यरात्रीपासून २१ ठिकाणी एटीएसची छापेमारी सुरु झाली. ही शोध मोहीम दहा तास सुरु होती.
या कारवाईदरम्यान अनेकांच्या घरातून मोबाईल हँडसेट, तलवारी, सुरा, मालमत्तेबाबत संशयास्पद दस्तावेज, दहशतवादाला उत्तेजन देणारे आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. साकिब नाचन यांच्या घरी देखील सर्च ऑपरेशन राबवण्यात आले, साकिबच्या नातेवाईकांची देखील चौकशी करण्यात आली.
एटीएसच्या कारवाईनंतर पडघ्याचा साकीब नाचण पुन्हा चर्चेत आला. मुंबई साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी साकिब नाचण याला काही वर्षांपूर्वी अटक केली होती. तेव्हापासून पडघा, साकीब नाचण आणि बोरीवली गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे.