Navi Mumbai : नवी मुंबईत बेसुमार उत्खनन, डोंगर धोक्यात! डोंगर पोखरणारे 'उंदीर' कोण आहेत? ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी मुंबई : रायगड, रत्नागिरी, सातारा येथे डोंगर कोसळल्याने 200 पर्यंत लोकांचे जीव गेले. अशीच काहीशी परिस्थिती नवी मुंबईत शहरात होण्याची दाट शक्यता आहे. शहराच्या पुर्वेला असलेल्या पारसिक हिल डोंगररांग दगडखाणीने पोखरल्याने 50-60 हजार कुटुंबांचे जीव टांगणीला लागले आहेत.
मुसळधार पडलेल्या पावसामुळे रायगड, रत्नागिरीमध्ये डोंगराचे भूस्खलन झाल्याने निष्पाप लोकांचे जीव गेले. डोंगराखाली वसलेल्या गावांवर दरड पडल्याने गावच्यागावं नामशेष झाले. मुंबईतही अशाच प्रकारच्या घटनेत लोकांचा नाहक जीव गेला. अशीच काहीशी परिस्थिती नवी मुंबई शहरात होण्याची दाट शक्यता आहे. नवी मुंबई शहराच्या पुर्वेस असलेल्या 25-30 किलो मीटर पारसिकहिल डोंगररांगाच्या पायथ्याशी हजारो झोपडपट्ट्या वसल्या आहेत. 50 ते 60 हजार गरीब परिवार या डोंगरपायथ्याशी असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. जोरदार पाऊस सुरू झाल्यावर आपणास झोप येत नसल्याचे येथील लोक सांगतात. कधी डोंगर कोसळेल आणि आमचा जीव जाईल याची शास्वती नसल्याने पावसाळ्यात रात्र जागून काढावी लागत आहे. महानगर पालिका झोपडपट्टी पुर्नविकास योजना लागू करत नसल्याने आम्हाला डोंगराचा सहारा घ्यावा लागत असल्याचे येथील लोक सांगतात.