Dance Bar च्या आड Sex चा बाजार, नवी मुंबईत कुणाच्या आशीर्वादाने डान्स बार सुरू?
दीपेश त्रिपाठी | 27 Dec 2021 10:38 PM (IST)
नवी मुंबई : काही दिवसांपूर्वी ठाण्यातून डान्सबारचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलं. प्रशासनानं कारवाई केली. अजूनही ते सगळे डान्सबार बंद आहेत. पण, ठाण्यापासून काही किलोमीटर अंतरावरच नवी मुंबईमध्ये डान्सबारचं नवं पेव फुटलंय. फक्त डान्स बार नाही, तर त्याच्या आड वेश्याव्यवसायही सुरु आहे. एक, दोन नाही...तर तब्बल सहा ठिकाणी एबीपी माझाचा कॅमेरा पोहोचला. आणि तिथला काळेधंदे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.