Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
एखादा व्हीव्हीआयपी गाडीत बसलाय आणि सामान्य जनता त्याचा एक मिनिट मिळावा... आपलं म्हणणं त्यानं ऐकून घ्यावं यासाठी गयावया करतेय... हे चित्र आपण अनेकदा बघितलं असेल... पण जर गाडीत पण व्हीव्हीआयपी आणि गयावया करणाराही व्हीव्हीआयपी, असा सीन तुम्ही कधी बघितलाय का... नसेल बघितला तर आता बघा.. हा नुसता सीन नाही आहे.. तर या सीनमध्ये राजकीय पिक्चरही दडलाय..
अलिशान गाडीत बसलेल्या व्यक्तीची फक्त पाच मिनिटं मिळावीत, म्हणून विनवणी करणारे हे आहेत राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ..
आणि त्यांच्या जोडीला आहेत नाशिकच्या इगतपुरीचे, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर..
आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल..
एक कॅबिनेट मंत्री आणि एक आमदार कुणासमोर एवढं गयावया करताहेत?
तर गाडीमध्ये बसलेली व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन आहेत.
अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं अजितदादांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवत युती केली आहे...
नाशिकमध्ये मात्र भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याची सध्या तरी चर्चा आहे..
मात्र ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे नेते गिरीश महाजनांची पाच मिनिटं मिळावीत यासाठी आग्रही दिसताहेत त्यावरून कुजबूज सुरू झाली नसती तरच नवल
कार्यकर्त्यांची गर्दी असल्यानं इथे चर्चा करण्याऐवजी पुढे जाऊन चर्चा करावी असं गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सूचवलं... त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते काही अंतरावर गिरीश महाजन यांना जाऊन भेटले.. आणि पाच मिनिटांत जे काही सांगायचं होतं ते सांगण्याची अखेर त्यांना संधी मिळाली.. आता पाच मिनिटांत नाशकातल्या महायुतीचं काय ठरलं हे बैठकीत उपस्थित नेत्यांनाच ठाऊक.. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांची देहबोली बरंच काय सांगून गेली एवढं नक्की