NASA DART Test : अंतराळात महाटक्कर, Mission Dart यशस्वी ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहॉलिवूडच्या चित्रपटाला शोभावी अशी घटना पृथ्वीपासून सुमारे एक कोटी किलोमीटरवर घडलीय. अंतराळात फिरणाऱ्या लघुग्रहांच्या धोक्यापासून पृथ्वीला वाचवण्याच्या मिशनची पहिली पायरीय यशस्वी झाले.... अमेरिकन अंतराळ संस्था नासाचं पृथ्वीच्या सुरक्षेशी संबंधित 'मिशन डार्ट' यशस्वी झालंय.... नासाने डिमॉरफस नावाच्या लघुग्रहावर हे डार्ट नावाचं यान सोडलं होतं. ताशी 27 हजार किलोमीटर वेगाने हे यान डीमॉर्फस या लघुग्रहावर धडकलं... या धडकेमुळे डीमॉर्फसच्या कक्षेत अगदी किंचितसा बदल होणं अपेक्षित आहे. मात्र हा बदल पृथ्वीसाठी मोठा दिलासा देणारा असेल. पृथ्वीला धोकादायक ठरणारे शेकडो लघुग्रह सध्या अंतराळात फिरत आहेत. भविष्यात हे धोकादायक लघुग्रह थांबवण्यास किंवा त्यांची दिशा बदलण्यास यामुळे मदत होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानं नासाच्या वैज्ञानिकांनी जल्लोष केलाय...