Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोरील अडचणी काही संपत नाहीयेत... नाशिक सत्र न्यायालयानं शिक्षा ठोठावल्यानंतर मंत्रिपद गेलंच शिवाय त्यांच्या आमदारकीवरील टांगती तलवारही कायम आहे... आज हायकोर्ट दिलासा देईल असं त्यांना वाटत होतं... दिलासा मिळालाय... पण तो अर्धाच! शिवाय त्यांच्या प्रकृतीबाबतही काहीशी चिंताजनक बातमी आलीये... नेमकं आज दिवसभरात काय घडलं बघुयात हा स्पेशल रिपोर्ट...
३० वर्षांपूर्वीच्या सदनिका अपहार प्रकरणी मंत्रिपद गमवावं लागल्यानंतर... माणिकराव कोकाटेंना जामीन मिळणार की त्यांना तुरूंगात जावं लागणार? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सगळ्याचं लक्ष उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलं होतं.. न्यायालयाच्या निर्णयानंतर माणिकराव कोकाटेंची तुरूंगवारी तूर्तास टळली आहे... कारण एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करत, न्यायालयानं कोकाटेंच्या २ वर्षांच्या शिक्षेला तूर्तास स्थगिती दिली आहे.. मात्र, सदनिका अपहार प्रकरणात माणिकराव कोकाटे दोषी आहेत, या नाशिक न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय.. निर्णय सुनावताना कोर्टानं नोंदवलेलं निरीक्षण अतिशय महत्त्वाचं आहे.कोकाटे हे आमदार म्हणून कार्यरत होते आणि ते मंत्री आहेत, ही बाब नोंद घेण्यास अत्यंत महत्त्वाची आहे. कायद्याचे राज्य टिकवून ठेवणे, नागरिकांच्या हिताचे संरक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे या कारणावरून गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीस पदावर राहण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक सेवेवर गंभीर, भरून न निघणारे परिणाम होऊ शकतो अशा प्रकारच्या निर्णयामुळे लोकशाही संस्थांवरील जनतेचा विश्वास डळमळीत होईल आणि कायद्याचे पालन करणाऱ्यांचे मनोबल खचेल.
माणिकराव कोकाटेंची आमदारकी जाणार की राहणार याचा फैसला विधानसभा अध्यक्षच घेणार आहेत... मात्र वकिलांच्या मते माणिकराव कोकाटेंना आमदारकीही गमवावी लागणार आहे..
एकीकडे कोकाटेंच्या प्रकरणावर न्यायालयात युक्तिवाद झाला... तर दुसरीकडे कोकाटेंवरून राजकीय काथ्याकूट देखील सुरूच आहे...