Nanded Hospital Death Special Report : 36 तासात 31 मृत्यू! नांदेडमधील मृत्यूतांडवाला जबाबदार कोण?
abp majha web team
Updated at:
03 Oct 2023 09:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड : गेल्या 24 तासांत 24 रुग्णांच्या मृत्यूनंतर नांदेड शासकीय रुग्णालय (Nanded Government Hospital) चर्चेत आले आहे. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. मात्र, आता याच रुग्णालयाबाबत आणखी काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. कारण या रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सुविधांमुळे रोज तीन-चार बालकांचे मृत्यू होत असल्याचे समोर येत आहेत. विशेष म्हणजे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मागील दोन दिवसांत लहान बालकांचे झालेल्या मृतांचा आकडा या रुग्णांलयातील आजवरचा सर्वात मोठा आकडा ठरला आहे. ज्यात पहिल्या दिवशी 11 आणि दुसऱ्या दिवशी 5 असे एकूण 16 बालकांचे दोन दिवसांत मृत्यू झाले आहेत.