धन्यवाद गडकरीजी! रेमडेसिवीर, ऑक्सिजनसाठी मिळवून दिल्याबद्दल नागपूरकरांनी मानले गडकरींचे आभार
सरीता कौशिक, एबीपी माझा | 18 Apr 2021 10:46 PM (IST)
नागपूर : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकार सर्वच स्तरावर इजेक्शनचा योग्य पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. आता वर्ध्यातील 'जेनेटेक लाईफ सायन्सेस'ला 30 हजार वायल (कुपी) प्रतिदिन रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं आहे. नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारकडून ही परवानगी मिळाली आहे.