Maharashtra Politics:मतदार यादीवरून MVA-भाजप आमनेसामने, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी Special Report
abp majha web team | 01 Nov 2025 11:54 PM (IST)
मुंबईच्या रस्त्यावर महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात जोरदार शक्तिप्रदर्शन बघायला मिळालं. मतदार याद्यांमधील (Voter Lists) घोळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) मोर्चा काढला, तर भाजपने याला 'फेक नरेटिव्ह' म्हणत मूक आंदोलन केलं. भाजपने 'जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी, ही विरोधकांची भूमिका आहे,' असा थेट आरोप केला. या मोर्चाला 'सत्याचा मोर्चा' असं नाव देण्यात आलं असून, यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह आघाडीचे अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. भाजपने MVA च्या या आंदोलनाला नौटंकी आणि असत्याचा फॅशन शो म्हटलं आहे, तर दुसरीकडे मतदार याद्यांमध्ये दुरुस्तीची गरज असल्याचं मात्र मान्य केलं आहे. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे.