स्टेशन मास्तर नितेश सिन्हा यांचा उपक्रम, स्वखर्चातून शिवडी स्थानकाची रंगरंगोटी, स्थानकाचा चेहरा-मोहरा बदलला
दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा Updated at: 05 Aug 2021 08:55 PM (IST)
नितेश सिन्हा यांनी कुठल्याही प्रकारची शासनाची आर्थिक मदत न घेता स्वखर्चातून स्टेशनची रंगरंगोटी केली तसेच भिंतींवर समाजाला संदेश देणारे चित्र सुद्धा स्वतःच्या हाताने काढलेली. या स्टेशनवर आधी जागोजागी थुंकले असायचं, सिन्हा यांनी स्टेशनचा कानाकोपरा स्वच्छ केला आणि लोकांनाही स्वच्छतेचा संदेश दिला. इतकंच नाही तर सिन्हा यांनी हे सगळं स्वतःच्या पैशाने केलं, समाजाप्रती त्यांची ही बांधिलकी पाहून समाज सेवी संस्था सुद्धा पुढे सरसावल्या आणि त्यांनी वरदहस्ताने शिवडी स्टेशनचा कायाकल्प बदलण्यासाठी नितेश सिन्हा यांना मदत केली.