Mumbai Rains : पावसाचं धुमशान, मुंबईची तुंबई; मिठी नदी धोक्याच्या पातळी Special Report
abp majha web team | 19 Aug 2025 07:30 PM (IST)
मुंबई आणि ठाणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचा मोठा खोळंबा झाला. रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली. मुंबईतील Hindmata, Wadala Station, King Circle आणि Dadar Station परिसरात गुडघाभर ते कमरेइतकं पाणी साचलं होतं. Wadala Station वरील रेल्वे ट्रॅक दोन फूट पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. BKC Metro स्थानकातही गळती होऊन पाणी साचले. Bhandup आणि Mira Bhayandar मध्ये झाडं कोसळून रिक्षा आणि रस्ते वाहतुकीचं नुकसान झालं. मुंबईतून वाहणाऱ्या Mithi नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे Kurla आणि Bandra परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. "याकरते आप लोक जो घर में है, घर खाली कर दीजिये," अशी सूचना देण्यात आली. ठाण्यातही पूरस्थिती निर्माण झाल्याने Dighar भागात घरांमध्ये पाणी शिरले. पुराच्या पाण्यात सापही दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. मुंबई महापालिका कंट्रोल रूममधून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.