Metro Name Row : मेट्रो स्टेशनच्या नावावरून वाद, नेहरूंचं नाव वगळल्याचा आरोप Special Report
abp majha web team | 14 Oct 2025 10:06 PM (IST)
मुंबई मेट्रो-३ (Mumbai Metro-3) च्या वरळीतील स्टेशनच्या नावावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय वाद पेटला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचे नाव जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप केला आहे. 'सरकारमधले जे लोक आहेत हे किती अधर्मी आहेत, त्यांनी राजधर्म पाळलेला नाही', अशा शब्दात सचिन सावंत यांनी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसच्या मते, हे स्टेशन 'नेहरू सायन्स सेंटर' (Nehru Science Centre) नावाने ओळखले जाते, परंतु भाजपने 'नेहरू' नावाची ॲलर्जी असल्यामुळे केवळ 'सायन्स सेंटर' असे नाव दिले आहे. यावर भाजपने २०१३ च्या राजपत्राचा संदर्भ दिला, ज्यामध्ये 'सायन्स म्युझियम' असा उल्लेख होता. हा वाद आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापत असून, काँग्रेसकडून भाजपवर नेहरूद्वेषाचा आरोप करत प्रचार केला जात आहे.