MPSC विद्यार्थ्यांचं वास्तव... पोस्टिंगअभावी कुणी भाजी विकतंय, कुणी भंगार विकतंय : स्पेशल रिपोर्ट
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
11 Jul 2021 09:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या नियुक्ती प्रक्रीयेनं एका होतकरु, बुद्धिमान तरुणाचा बळी घेतला. आज ना उद्या मुलाखत होईल, नियुक्ती होईल ही वाट पाहून नैराश्यात गेलेल्या पुण्याच्या स्वप्नील लोणकरनं आत्ममहत्या केल्यानंतर महाराष्ट्रातल्या स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणा-या तरुणांचं भीषण वास्तव समोर आलंय. महाराष्ट्रात 400 पेक्षा अधिक तरुण-तरुणी हे स्पर्धा परिक्षा पास होऊन अधिकारी झालेत खरे मात्र नियुक्त्याच होत नसल्यानं या कागदावरच्या अधिका-यांच्या वाट्याला हलाखीचं जीणं आलंय. मोठ्या स्पर्धेतून निवडले गेलेले हे तहसीलदार, बिडीओ कधी भाजी विकतायेत कधी भंगार गोळा करतायेत तर काही मजुरीही करतायत.