कर्जबुडव्या उद्योगपतींची कोट्यवधींची संपत्ती जप्त,मल्ल्या, नीरव, चोक्सीला ईडीचा जोरदार दणका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jun 2021 10:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मनी लॉन्ड्रिंग कायद्यांअंतर्गत गेल्या काही वर्षात ईडीने विजय माल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या तिघांची मालमत्ता जप्त केली होती. विजय माल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या तिघांनी बँकांचे जवळपास 22 हजार 586 कोटीचे कर्ज बुडवले आहे. त्यापैकी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 80.45 टक्के म्हणजेच 18 हजार 147 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यातील काही रक्कम आणि मालमत्ता कर्जदार बँका आणि केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आली आहे.