Memes On Politics Special Report : राजकीय भूकंपावरुन मीम्सचा पाऊस, अरे करना क्या चाहते हो?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या चार वर्षात महाराष्ट्राने तीन मुख्यमंत्री, चार उपमुख्यमंत्री आणि बरेच मंत्री पाहिले. काय करणार सरकारच तेवढं अस्थिर होतं... पहाटेच्या शपथविधीवेळी स्थापन झालेलं अवघं दोन दिवस टिकलं. पुढे मविआचं सरकार स्थापन झालं ते अडीच वर्ष टिकलं पण शिंदेंच्या एका बंडाने मविआचंही सरकार कोसळलं. मग आलं शिंदे फडणवीस सरकार.. आता या सरकारला एक वर्ष पूर्ण होत नाही तोवर राष्ट्रावादीत फूट पडून ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.. त्यामुळे आता डबल इंजिनला राष्ट्रवादीच्या नव्या नऊ मंत्र्यांची साथ लाभलीये.. सध्याचं राजकारण म्हणजे अवकाळी पावसासारखं झालंय... आणि याच बदलत्या राजकारणामुळे सोशल मीडियावरही मिम्सचा पाऊस सुुरु झालाय.. घटकेत विरोधात तर घटकेत सत्तेत हे चित्र पाहून एवढंच विचारावसं वाटतं..अरे करना क्या चाहते हो?