मॅनहोल की मृत्यूचे सापळे? दुर्घटना घडल्यावर जबाबदारी कोण घेणार? मुंबईकरांच्या जीवाशी खेळ कोण करतंय?
दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा | 10 Jun 2021 11:43 PM (IST)
मुंबई : मुंबईत (Mumbai Rain)गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (heavy rain) सुरु आहे. काल भांडुपमध्ये मॅनहोल उघडे ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये पडताना दोन महिला थोडक्यात बचावल्या. याची अंगावर काटा उभारणारी दृश्य सर्वांनी पाहिली. अनेक दुर्घटना घडत असताना मुंबई महापालिका कधी धडा घेणार असा प्रश्न विचारण्यात येतो आहे. यावरुन सध्या राजकारण तापलं आहे.