Be Positive : पाईपचा वापर करत फुलवली बाग, 1350 रोपांची लागवड, पर्यावरण प्रेमी मंदार थिटे यांची कमाल
नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड
Updated at:
12 Jul 2021 08:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवृक्ष लागवड तर करायची खूप इच्छा आहे, पण जागाच उपलब्ध नाही हे कारण आपल्याला हमखास ऐकायला मिळतं. पण यावर ही पुण्यातील एका अवलियाने जालीम उपाय शोधलाय. तीस रोपांच्या जागेत या अवलियाने तब्बल तेराशे पन्नास रोपांची लागवड केली आहे. पुण्याच्या तळेगाव मधील मंदार थिटे या पर्यावरण प्रेमीने पीव्हीसी पाईपमध्ये हे व्हर्टिकल गार्डन फुलवलं आहे. याद्वारे थिटे यांनी तीस रोपांना लागणाऱ्या जागेत तब्बल 1350 रोपांची लागवड केली आहे.