मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटांना 28 वर्षे, मेजर वसंत जाधव अजूनही कौतुकाच्या प्रतिक्षेत
निलेश बुधावले, एबीपी माझा | 12 Mar 2021 08:44 AM (IST)
मुंबई : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषींना शिक्षा सुनावण्यात आली. 1993 मुंबई साखळी स्फोटाप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने मुस्तफा डोसा, कुख्यात गँगस्टर अबू सालेम, करिमुल्ला खान, फिरोज अब्दुल रशीद खान, रियाझ सिद्दीकी, ताहिर मर्चंट या सहा आरोपींना दोषी ठरवलं होतं.
यातील एक दोषी मुस्तफा डोसा याला सीबीआयने फाशीची मागणी केली होती. पण शिक्षेच्या युक्तीवादादरम्यानच त्याचा मृत्यू झाला होता. तर यातला सातवा आरोपी अब्दुल कय्यूम याची कोर्टाने निर्दोष म्हणून मुक्तता केली होती.