Mahayuti Seat Sharing : मनपासाठी महायुतीचं कुठे ठरलं कुठे अडलं? Special Report
तुमच्या महापालिकेत महायुतीतलं जागावाटप कुठवर आलंय? शिंदे आणि फडणवीसांच्या युतीत कुठेकुठे अजितदादांना एन्ट्री मिळालीय आणि कुठेकुठे बाहेर ठेवण्यात आलंय़..? कुठे भाजप ऐकत नाहीय आणि कुठे शिवसेना ऐकायला तयार नाहीय..? पाहुयात महापालिकानिहाय आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा...
(मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार असा चंग भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं बांधलाय.. अजित पवारांना बाजूला ठेवून युती करणाऱ्या या दोन पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय. त्यानुसार भाजप १४० तर शिंदेंची शिवसेना ८७ जागा लढणार असल्याचं समजतंय. जेवढ्या लवकर उमेदवारांची यादी जाहीर करू तेवढी बंडखोरी होण्याची शक्यता जास्त... म्हणून आता भाजप आणि शिवसेना उमेदवारांची यादी कधी जाहीर करते हे पाहावं लागेल
मुंबईत जागावाटपाचं गणित सुटलं असलं तरी मुंबई शेजारी असलेल्या ठाण्यामधला जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे.. भाजपकडून ४० ते ४५ जागांची मागणी केली जातेय..मात्र शिवसेनेला हा आकडा मान्य नाही. त्यामुळे निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे धाव घेतलीय. आता या तिन्ही नेत्यांमध्ये जे काही ठरेल त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत देखील बैठक होणार असल्याचं बोललं जातंय
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. कारण भाजपसोबत जागावाटपाच्या चर्चांमध्ये त्या कमी पडत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे.. पुण्यात शिवसेनेकडून ३५ जागांची मागणी करण्यात आलीय. मात्र भाजपनं १५ जागाच देऊ केल्यानं आता शिवसेनेनं निर्णायक इशारा दिलाय. दुसरीकडे