Voter List Row : मतदार याद्यांमध्ये घोळ, निवडणूक आयोगावर चौफेर टीका Special Report
abp majha web team Updated at: 04 Nov 2025 11:30 PM (IST)
महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील (Voter List) घोळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरे यांनी 'निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलंय,' असा थेट आरोप करत आपला संताप व्यक्त केला. दुबार मतदारांना (Duplicate Voters) रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने 'डबल स्टार' (Double Star) प्रणाली आणल्याची माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली, त्यानुसार संशयित मतदारांकडून मतदान केंद्रावर घोषणापत्र घेतले जाईल. तर दुसरीकडे, भाजपने 'वोट जिहाद'च्या (Vote Jihad) मुद्द्यावरून विरोधकांना घेरले आहे, ज्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. २ डिसेंबर २०२५ रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी होईल.