✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

abp majha web team   |  14 Dec 2025 10:22 PM (IST)

संकल्पना, शेरोशायरी, टोमणे, प्रत्युत्तरं आणि इशारे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसाचं भाषण अशा सर्व गोष्टींनी गाजलं. रचनात्मक महाराष्ट्र घडवण्यापासून ते गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठीच्या उपाययोजनांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश असणारं मुख्यमंत्र्यांचं भाषण आज लक्षवेधी ठरलं. एकीकडं महाराष्ट्राचं व्हिजन मांडताना दुसरीकडं विरोधकांच्या प्रश्नांना आणि टोमण्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रत्युत्तरं नेमकी कशी होती, याचा आढावा घेऊया, राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमधून. 



((ओपन विथ मुख्यमंत्री शेर))
व्हिओ - 
अधिवेशनात हा शेर ऐकवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणायचं होतं, हे तेच सांगू शकतील.
मात्र त्यांच्या या शेरचे अनेक अर्थ लावत विधिमंडळाच्या अधिवेशनाची सांगता झाली. 
सोमवारपासून सुरु झालेलं एका आठवड्याचं अधिवेशन आज संपलं.
शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण हे त्यांच्या घोषणा, इशारे आणि टोलेबाजी यामुळं चांगलंच गाजलं. 
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा पूर्वार्ध गाजला तो त्यांनी मांडलेल्या महाराष्ट्राच्या व्हिजनमुळे.
रचनात्मक महाराष्ट्र घडवण्यासाठी पावलं उचलण्याचा मनोदय फडणवीसांनी व्यक्त केला. 


बाईट - देवेंद्र फडणवीस
((नवीन सरकार आल्याला एक वर्ष पुर्ण झालेत. ⁠जी आव्हाने आली ती पुर्ण करण्याचा प्रयत्न केला. - ⁠लोकशाहीच शेवटची संस्था ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक आहे. ⁠महाराष्ट्र आता थांबणार नाही.  ⁠नगरपालिका निवडणुकीत आम्ही विकासाचा अजेंडा मांडला. ⁠आम्ही कोणावर टिका केली नाही. ⁠सभागृहाच्या दोन ही बाजूच्या नेत्यांना माझी विनंती आहे. ⁠रचनात्मक महाराष्ट्र याचा विचार केला पाहिजे))


व्हिओ - 
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा मुद्दा विरोधकांनी तापवायला सुरुवात करण्यापूर्वीच फडणवीसांनी तो थंड करून टाकला. 


बाईट - देवेंद्र फडणवीस
((१०६ हुतात्म्यांनी तयार केलेला महाराष्ट्र आहे. मुंबई तोडली जाईल असा विचार करू नये. निवडणूक आली की अशा टीका होतात. सभागृहात सांगतोय. मुंबई कालही महाराष्ट्राची होती. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहील
आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला त्या तत्वाने महाराष्ट्र चालत राहील. महाराष्ट्राला हे तत्त्व मान्य होते. पण देशपातळीवर अनेक संभ्रम होते. म्हणून सीबीएससी पुस्तकात यापूर्वी मराठा साम्राज्य व छत्रपती एक पॅरापुरता होता. तर मुघल १७ पानांचा. आता २१ पानांचा अभ्यास सीबीएससीने घेतला आहे. शौर्याचा इतिहास केंद्राने घेतला त्याबाबत आभार मानतो))


व्हिओ - 
फडणवीसांचं भाषण असताना विरोधी बाकांवरूनही सातत्यानं टोमणे आणि चिमटे काढण्याचे प्रकार सुरु होते.
जयंत पाटील आणि फडणवीस यांच्यातील टोलेयुद्ध त्यापैकी सर्वाधिक लक्षवेधी ठरलं. 


((टू विंडो बाईट))
बाईट - देवेंद्र फडणवीस
(( ⁠सभागृहाच्या दोन ही बाजूच्या नेत्यांना माझी विनंती आहे. ⁠रचनात्मक महाराष्ट्र याचा विचार केला पाहिजे. एकत्रीत पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. जयंत पाटील- तुम्ही दिल्लीत पुढे जात आहे म्हणुन ते दोघे खुश आहेत. मुख्यमंत्री- मी नागपुर पासुन मुंबईकडे गेलो आहे. ))


बाईट - देवेंद्र फडणवीस
(( ⁠विज खरेदी मध्ये विज कंपनीला १० हजार कोटी रुपयांचा फायदा होईल.  ⁠पावणे तीनशे कोटी झाडांच मेटीगेशन या १६ मेगावॉट साठी लागले असते. ⁠म्हणजे आपण पावने तीनशे कोटी झाडं लावली अस आपण म्हटलं पाहिजे. ⁠२१ पुरस्कार आपल्याला मिळाले. मुख्यमंत्री- ⁠- सुधीर मुनगंटीवार आणि मला लोकांनी बुस्टर पंपाचा व्हिडीओ पाठवला. लोकांचा प्रश्न मिटला. जयंत पाटील( खाली बसुन)  सुधीर भाऊंना बुस्टरची गरज आहे. मुख्यमंत्री- सुधीर भाऊच एक मोठे बुस्टर पंप आहेत. ))


व्हिओ - 
मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी काही प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. 
त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा पारा चढला आणि त्यांनी खरातांना त्यांच्या शैलीत तंबी दिली. 


बाईट - देवेंद्र फडणवीस
((- विदर्भाच्या संदर्भात मागे काय केलं हे सांगायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही.  ⁠तुम्ही पहिल्यांदा निवडणून आलेले आहेत.  ⁠तुम्हाला सभागृहाची शिस्त माहित नाही))


व्हिओ - 
तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणात आपण का बोललो, हे खरातांनी एबीपी माझाला सांगत आपली बाजू स्पष्ट केली. 


बाईट - सिद्धार्थ खरात
((मुख्यमंत्री यांना थांबवण्यामागच कारण एवढंच होतं की मुख्यमंत्री अनेक आकडेवारींची घोषणा करत होते आणि माझ्या मतदारसंघात जिल्ह्यात काहीच मिळालं नाही.  ⁠नुसती आकडेवारीची घोषणा करुन काय फायदा. ⁠अधिवेशन नागपुरला आणि घोषणा मुंबईच्या ⁠आमच्या तोंडाला पाने पुसल्यासारख आहे
- ⁠याचा फायदा मुंबई महानगरपालिकेत होईल विदर्भाला काय मिळालं. ))


व्हिओ - 
विदर्भानंतर मुख्यमंत्र्यांच्या भाषणात आणखी एक प्रश्न विचारला तो ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधवांनी.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रसंगावधान राखत दिलेलं उत्तर लक्षवेधी ठरलं. 


बाईट - देवेंद्र फडणवीस
((भास्कर जाधव - मुंबई गोवा बद्दल पण सांगा
मुख्यमंत्री - बोलणार, मी मराठवाडा व विदर्भाचा जरा जास्त अभ्यास करून आलो))


व्हिओ - 
महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांनाही फडणवीसांनी सविस्तर उत्तर दिलं. 


बाईट - देवेंद्र फडणवीस
((महाराष्ट्रात अल्पवयीन मुली किंवा महिला परत आणण्याचा गर वर्षाचा ८६ टक्के आहे. तर पुढील वर्षात त्यात १० टक्के वाढ होते. त्यामुळे एकूण ९६ टक्क्यांपर्यंत जातो. मुंबईत परत आणण्याचा दर ९९ टक्के आहे. 
२०२२ साली याठिकाणी एकूण १८९२ पैकी १८७० परत आले. २०२३मध्ये २२७० पैकी १८८७ परत आले. 
२०१४मध्ये १९९९ पैकी १९७३ परत आणले. म्हणजे स्टॅटिस्टिक्स कसे मिसलिडिंग होते))


व्हिओ - 
फडणवीस सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झालं.
त्या पार्श्वभूमीवर झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारनं आपली कामगिरी जोरकसपणे महाराष्ट्रासमोर मांडायचा प्रयत्न केला.
आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांपूर्वीचं हे अधिवेशन होतं.
यामध्ये विरोधकांनी केलेले आरोप आणि सत्ताधाऱ्यांनी केलेले दावे याचा प्रत्यक्ष निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

TRENDING VIDEOS

Lionel Messi Mumbai Wankhede : फुटबॉल चाहत्यांची आतुरता संपली वानखेडेवर मेस्सीची पहिली झलक!3 Hour ago

Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..7 Hour ago

Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले8 Hour ago

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत8 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.