Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणित आणि विज्ञान हे दोन विषय म्हटलं की अनेक विद्यार्थ्यांचे चेहरे हिरमुसून जातात... प्रगतिपुस्तक हातात पडलं की, या दोन विषयांचे गुण बघताना मुलांच्या काळजात धडधड होते... मात्र आता राज्य सरकारने यावर मोठा दिलासा दिलाय... दहावीला गणित आणि विज्ञान विषयांमध्ये २० मार्क मिळाले तरी विद्यार्थी अकरावीला जाऊ शकतात... पाहूयात...
तुमच्यापैकी अनेकांना ही चित्र पाहिल्यावर शाळेतले गणित आणि विज्ञानाचे तास आठवले असतील कारण अनेकांची त्या दोन्ही विषयांमध्ये कासवगती असल्याचं सगळ्याच वर्गांमध्ये आजही पाहायला मिळतंय.
पण विद्यार्थ्यांच्या मनातली गणित आणि विज्ञानाची भीती घालवण्यासाठी आता राज्य सरकारनं नव्या अभ्यासक्रम आराखड्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय...
या नव्या शैक्षणिक आराखड्यानुसार गणित आणि विज्ञानात दहावीला कमी म्हणजेच 20 गुण मिळाले तरीही विद्यार्थ्यांना
अकरावीत प्रवेश घेता येणारय...
गणित, विज्ञानात २० गुणांना उत्तीर्ण
- नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार गणित, विज्ञानावर तोडगा
- दहावीला गणित, विज्ञानात २० गुण मिळाले तरी पास
- २० गुणांसह अकरावीत प्रवेश घेता येणार
- विशिष्ट शेऱ्यासह मिळणार दहावीचं प्रमाणपत्र
- अन्यथा दहावीची परीक्षा पुन्हा देण्याचीही संधी
- ज्यांना पुढे विज्ञान, गणिताचा अभ्यासक्रम घ्यायचा नाही त्यांना फायदा