BMC Election : महानगरपालिका आरक्षण सोडत, दिग्गजांना मोठा धक्का Special Report
abp majha web team | 11 Nov 2025 10:18 PM (IST)
राज्यातल्या मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरसारख्या प्रमुख महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून अनेक विद्यमान आणि माजी नगरसेवकांना मोठा फटका बसला आहे. मुंबईत, शिवसेनेचे (शिंदे गट) यशवंत जाधव, भाजपचे रवी राजा आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) आशिष चेंबूरकर यांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. या सोडतीमुळे अनेक ठिकाणी 'कुठे खुशी कुठे गम' असे वातावरण असून, प्रत्येकच पक्षात राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत. पुणे, नागपूर आणि ठाण्यातही अनेक दिग्गजांचे वॉर्ड महिला, ओबीसी किंवा एससी/एसटी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांना आता नव्या प्रभागाची चाचपणी करावी लागत आहे किंवा घरातून दुसऱ्या उमेदवाराला संधी द्यावी लागत आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ पैकी ११४ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.