नुकसान लाखांचं, चेक अठराशेचा! ही कसली भरपाई? विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा होतेय का?
एबीपी माझा वेब टीम | 26 Dec 2020 07:39 PM (IST)
हिंगोली/नांदेड : यंदा कोरोना काळात एकीकडे कंबरडे मोडले असताना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरुनही त्यांना वेळेवर मदत मिळाली नाही. काही ठिकाणी मदत मिळाली तर ती अत्यंत तोकडी. यामुळं संतापलेल्या शेतकऱ्यांनी तुटपुंजी रक्कम शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पीक विमा कंपन्यांच्या विरोधात हजारो तक्रार अर्ज दाखल झाले असल्याची माहिती आहे.