Lockdown Reality Check : लॉकडाऊनचा रिअॅलिटी चेक, ब्रेक द चेन मोहिमेला नागरिकांचा कसा प्रतिसाद?
एबीपी माझा वेब टीम | 24 Apr 2021 12:04 AM (IST)
मुंबई : राज्यात काल (22 एप्रिल) रात्री आठपासून 'ब्रेक द चेन' अंतर्गत अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस राज्यातील रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. तसेच राज्यात ऑक्सिनज, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 'ब्रेक द चेन' अंतर्गत काल रात्री 8 वाजल्यापासून लागू होणारी सुधारित नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.