Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Continues below advertisement

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता आंबेडकर बंधूही एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे. त्यावर आनंदराज आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलं. आंबेडकरी चळवळ वाढवण्यासाठी भविष्यात आम्ही एकत्र येऊ असं मोठं वक्तव्य आनंदराज आंबेडकर म्हणाले. आनंदराज आंबेडकर सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. 

आम्ही शिंदेंकडे मागितलेल्या महत्त्वाच्या जागा या आम्हाला मिळाल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पण युतीचा धर्म पाळत आम्ही प्रयत्न करू असं आनंदराज आंबेडकर म्हणाले. 

Prakash Ambedkar Anandraj Ambedkar : दोन भाऊ एकत्र येणार का? 

आंबेडकरी चळवळीला गतीमान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं आनंदराज आंबेडकर म्हणाले. ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला एक काळ असतो, जसे ते दोन भाऊ एकत्र आलेत भविष्यात आम्हीही येऊ. दोघंही आंबेडकर विचार वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आंबेडकर चळवळ वाढवायची झाल्यास आपली माणसं तिथे बसायला हवीत. आम्हा दोघांमध्येही तात्विक मतभेद आहेत. प्रयत्न झाला तर माझा नक्कीच प्रतिसाद असेल असं मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केलं. 

महायुतीत आयत्यावेळी अनेकांनी युती तोडली. युतीचा धर्म कोणीच पाळला नाही. परिस्थिती गंभीर आहे. आम्ही म्हणू तेच अशी मोठ्या पक्षांची भूमिका आहे. आयत्या वेळी कोण कुणाला मदत करतोय हे समजेल. या गोष्टीचा परिणाम निवडणुकीवर  होऊ शकतो असं मत आनंदराज आंबेडकरांनी व्यक्त केलं.  

आंबेडकरी चळवळ एकत्र यावी हा आमचा प्रयत्न आहे. मात्र सत्तेत बसून नुसत्या या गोष्टी करून चालणार नाही असा टोला आनंदराज आंबेडकरांनी रामदास आठवलेंना लगावला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola