Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त 

छत्रपती संभाजीनगर: महायुती तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून सुरू असलेला वाद आता नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र दिसून येत आहे.  भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची गाडी रोखून धरली, तर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळे फासून आपला तीव्र निषेध नोंदवला. एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी पोलिस संरक्षणात सावे आणि कराड यांनी काढता पाय घेतला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारीवरून भाजपमध्ये  सलग दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. संतापलेल्या इच्छुक उमेदवारांनी  आणि संतप्त कार्यकर्त्यांनी  भाजप नेते भागवत कराड आणि अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला, यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले. यावेळी संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सावे आणि कराड यांचे फोटो फाडले. इच्छुक उमेदवारांनी घटनास्थळी गोंधळ घातल अंगावरती पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सावेंच्या पीएला आणि नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप केला आहे. 

संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सर्वे दाखवत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. अतुल सावेंना नेमकं काय भेटलं, त्यांनी त्यांच्या पीएला उमेदवारी दिली, त्यांनी फक्त वंजारी लोकांना पुढे केलं, त्यांनी आत्ताच्या आत्ता सर्वे आणावा, जर त्यात माझं नाव नाही आलं तर मी आयुष्यभर त्यांची गुलामी करेन, भागवत कराडांनी फक्त वंजाऱ्यांना तिकीट दिलं, असं म्हणत कार्यकर्त्यांनी अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. एकेरी शब्दात उल्लेख करत कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचंही यावेळी दिसून आलं.

भागवत कराड यांच्या गाडीला घेराव घालत संतप्त कार्यकर्त्यांनी गाडी आडवली, गाडीवरती काळं फासलं. यावेळी महिला कार्यकर्त्या देखील संतप्त झाल्याचं दिसून आलं. त्यांनी कार्यकर्त्यावरती अन्याय केला आहे. भाजप कोणाच्या बापाचा पक्ष नाही असंही संतप्त कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. घटनास्थळी मोठा राडा झाल्याचं चित्र दिसून आलं. छत्रपती संभाजीनगरमधील भाजपच्या कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. आमच्या घरी हे नेते येत होते, त्यासाठी आम्ही लाखो रूपये खर्च केले, आम्हाला उमेदवारी देऊ असं लॉलीपॉप दाखवलं, आम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत सांगितलं मात्र तिकीट दिलं नाही, यांच्या सर्व उमेदवार पडणार आहेत म्हणत संतप्त महिला कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola