Sharad Joshi Special Report : अंगारमळ्यातील निखारा शरद जोशी यांचा जीवनप्रवास
abp majha web team
Updated at:
12 Dec 2022 11:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत हा कृषिप्रधान देश, जवळपास ६० ते ७० टक्के भारतीय शेती करतात.. अनेकदा शेती म्हणजे तोट्याचा धंदा असं म्हटलं जातं किंवा तशी एक समजूतच अलिकडे ग्रामीण भागात निर्माण होऊ लागलीय. पण हे चुकीचं आहे असं ठामपणे सांगणारे एक लढवय्या नेते ८०च्या दशकात उभे राहिले. गलेलठ्ठ पगाराची परदेशातली नोकरी सोडून मातीत राबण्यासाठी पुन्हा मायदेशात परतले. शेतमालाच्या भावासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक यशस्वी चळवळी उभारल्या... ज्यात लाखोंच्या संख्येनं शेतकरी कुटुंब सहभागी व्हायची. आंदोलन पुकारायचं... ना मोबाईल, ना व्हॉट्सअॅप अशातही लाखो शेतकरी आंदोलनस्थळी जमा व्हायचे... ही ताकद ठेवणारा, शेतकऱ्यांचा हक्काचा आवाज म्हणजे शरद जोशी (Sharad Joshi). एबीपी माझाची स्पेशल डॉक्युमेंटरी - अंगारमळ्यातील निखारा शरद जोशी
(Sharad Joshi : Angarmalyatil Nikhara special documentary by ABP Majha Marathi Video)