Chandrapur Tadoba : चंद्रपूर : ताडोबात आढळला अतिदुर्मिळ 'तणमोर', देशात सध्या केवळ 264 तणमोर पक्षी
सारंग पांडे, एबीपी माझा | 05 Aug 2021 10:41 PM (IST)
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच तणमोर या पक्ष्याची नोंद झाली आहे. या तणमोर पक्षाच्या नोंदीने ताडोबातील वैभवात मोठी भर पडली आहे. हा पक्षी NUCN च्या अतिदुर्मिळ यादीत समाविष्ट असून देशात आजच्या घडीला केवळ 264 तणमोर पक्षी शिल्लक आहेत. व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात या तणमोर पक्ष्याचे फोटो आले आहेत. प्रजनन काळातील नर तणमोर पक्ष्याचे प्रणयनृत्य अतिशय प्रसिध्द आहे. मात्र अधिवास नष्ट होत असल्यामुळे दुर्मिळ झालेला हा तणमोर पक्षी ताडोबात आढळल्याने पक्षीप्रेमींमध्ये देखील आनंद व्यक्त केला जात आहे.