Kirit Somaiya : पुण्यातील झटापटीत भाजप नेते किरीट सोमय्या जखमी, आजची रात्र रुग्णालयात Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे दौऱ्यात आज राडा झाला. पुण्यातील शिवसेना कार्यकर्ते आणि किरीट सोमय्या यांच्यात झटापाट झाली. या झटापटीत किरीट सोमय्या जखमी झाले असून एक्सरे काढण्यासाठी आणि इतर तपासण्या करण्यासाठी ते पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
कोरोना काळात पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु, या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी ते आज पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पुणे महानगरपालिकेत आयुक्तांनाही यावेळी सिरीट सोमय्या तक्रार देणार होते. परंतु, यावेळी सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर पडले. त्यामध्ये ते जखमी झाले.