Crime : नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं अपहरण आणि मारहाण, आरोपीने स्वत: शेअर केला मारहाणीचा व्हिडीओ
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर | 05 Jul 2021 10:08 PM (IST)
नागपुरात गुन्हेगारांनी थैमान घातला आहे. रोज नव्या गुन्ह्यांची उकल होत असताना आता त्यात लाज आणणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. दोन गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी एका सतरा वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला दुचाकीवर बसवून मारहाण करत व्हीडिओ बनवल्याचे या व्हिडीओ द्वारे समोर आले आहे. दरम्यान या घटनेत फक्त तरुणीला मारहाण करत चित्रीकरणच करण्यात आलेले नाही, तर चालत्या दुचाकीवर तिला मारहाण करणारा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत लोकांना त्या व्हिडीओला लाईक करण्यासही या गुंडांनी सांगितले.