Kargil : कारगिल युद्ध स्मारकावर नतमस्तक होताना... कारगिलच्या युद्धभूमीतून एबीपी माझाचा खास रिपोर्ट
मनश्री पाठक, एबीपी माझा | 31 Oct 2021 11:56 PM (IST)
कारगिलला आपण सगळेच युद्धभूमी म्हणून ओळखतो. लडाखच्या नैसर्गीक सौंदर्यात वसलेल्या शहरानं बर्फवृष्टीसोबतच कधी तोफगोळ्यांची बरसातही झेललीय. हेच कारगील भारताशी मनानं जोडलं जावं, लेह-लडाखच्या परिसरातल्या तरुणांच्या अंगभूत क्षमतांना वाव मिळावा याकरता संजय नहार यांची सरहद संघटना गेली 24 वर्षे काम करते. सरहद कारगिल मॅरेथॉन हा सरहद संघटनेचा उपक्रम याभागात लोकप्रिय आहे.