Mumbai : के-पश्चिम वॉर्डमधील रुग्णसंख्या नियंत्रणात, लॉकडाऊनंतर इमारतींमधील रुग्णसंख्या मंदावली
अभिषेक मुठाळ | 08 May 2021 11:09 PM (IST)
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आज राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आज 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 4347592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.3% एवढे झाले आहे.