Jaipur Express Crime Special Report : जयपूर एक्स्प्रेसमध्ये शूटआऊट, चौघांचा मृत्यू; प्रकरण काय?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRPF Constable Shoots : महाराष्ट्रातील पालघर रेल्वे स्थानकाजवळ (Palghar Railway Station) रेल्वे सुरक्षा दलाच्या एका हवालदाराने सोमवारी आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याची आणि दोन बोगीतील तीन प्रवाशांची आणि जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Mumbai Central Express) हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. आरोपी आरपीएफ जवानाला (RPF Constable) अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवाशांची हत्या केल्यानंतर आरोपी चेतन सिंहचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर रेल्वे पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग (34) याने आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक टिका राम मीना आणि B5 कोचमधील अन्य एका प्रवाशाला त्याच्याजवळील स्वयंचलित शस्त्राने गोळ्या घालून ठार केले. त्याने B6 कोचमधील आणखी एका प्रवाशाला गोळ्या घालून ठार मारले. त्याशिवाय, B5 आणि B6 डब्यांच्या दरम्यान असलेल्या पॅन्ट्री कारमधील आणखी एकाची हत्या केली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. पालघरमध्ये गोळीबार केल्यानंतर मीरा रोड आणि दहिसर दरम्यान प्रवाशांनी साखळी खेचली आणि एक्स्प्रेस थांबवली. त्यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी चेतन सिंहला रेल्वे पोलिसांनी पकडले. अब्दुल कादिरभाई मोहम्मद हुसेन भानपुरवाला (48), अख्तर अब्बास अली (48) आणि सदर मोहम्मद हुसेन अशी मृत प्रवाशांची नावे आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने वापी (गुजरात) स्थानक ओलांडल्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.