Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लहान मुलांना देण्यात येणारी Influenza लस बाजारातून गायब? 700₹ ची लस 1500₹ वर, लशींची साठेबाजी?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 May 2021 10:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मान्सूनपूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस देण्यात यावी, असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्कफोर्स आणि नव्याने स्थापन केलेल्या पीडियाट्रिक टास्कफोर्सने राज्य सरकारला दिला आहे. रविवारी (23 मे) दोन्ही टास्कफोर्समधील डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे आवाहन केलं. इन्फ्लूएन्झाची लस दिल्यास या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, ज्यामुळे रुग्णालयांवर ताण कमी होऊन अनावश्यक चाचणी रोखण्यास मदत होईल, असं डॉक्टरांनी म्हटलं.