✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Indrayani River Bridge Accident : इंद्रायणी पूल दुर्घटना, जबाबदारी कोण घेणार? Special Report

abp majha web team   |  16 Jun 2025 11:30 PM (IST)

कुंडमळा दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला ते फक्त एका दुर्दैवी अपघाताचा बळी होते का? की निष्ठुर प्रशासकीय यंत्रणेचा? या अपघाताला गर्दीतील काही अतिउत्साही, कोणत्याच नियमांना न जुमानणारी वृत्ती सुद्धा कारणीभूत होती का? असे अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरं शोधणं बाकी असताना नेहेमीप्रमाणेच राजकारण सुद्धा सुरु झालंय. कुंडमळा प्रकरणात दिवसभर काय घडामोडी घडल्या पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट


 


Z:1606puneKundamala Bridge drone video

((मोंटाज- पूल अपघात चांगले व्हिज, ड्रोन ))
VO
कुंडमळा लोखंडी पूल दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न मागे उरले आहेत.

प्रशासनानं त्यांचं काम व्यवस्थित केलं का?
आणि पर्यटक खरंच पुरेशा जबाबदारीने वागले का हे त्यातील महत्वाचे दोन प्रश्न.

हा पूल कान्हेवाडी, इंदोरी, शेलारवस्ती आणि कुंडमळा वस्तीतील नागरिकांना पायी वापरासाठी होता,

मात्र नव्या पिकनिक आणि सेल्फी स्पॉटच्या शोधात पर्यटक इथे पोहोचले आणि विकेंडला इथलं वातावरण बदललं.

दोन्ही बाजूंनी पुलावर गरजेपेक्षा जास्त गर्दी होऊ लागली, अनेकदा कोणालाही न जुमानता दुचाकी सुद्धा पुलावर घातल्या जायच्या.
BITE - गावकरी चौपालमधील महत्वाचे मुद्दे
((R PUNE GAVKARI CHAUPAL LIVE 160625 ))

VO
खरं तर हा पूल दीड वर्षांपूर्वी वापरासाठी बंद करण्यात आला होता.

इंदोरी गावचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाने पूलाच्या दोन्ही बाजुला तसे सूचना फलक सुद्धा लावण्यात आले होते.

मात्र तिकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही आणि अपघात घडला.

BITE - योगेश बंडरेलो ((
R PUNE HOSPITAL TT LIVE 160625
मी मृत्यू डोळ्यादेखत पाहिला.
पूल कोसळला तेव्हा पुलाच्या मध्यभागी होतो
ज्या तिघांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू जवळून पाहिला
लोक सांगत होते घाई करू नका, जाऊ नका, पण कोणी ऐकल नाही आणि हे सगळं घडलं.))

VO
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित होतात?
GFX IN

- इंद्रायणी नदीवरचा पूल कमकुवत झाल्यानं त्यावरून ये-जा करण्यास मनाई होती, मग पर्यटक पुलावर कसे काय चढले?
- पर्यटकांनी पुलावर जाऊ नये म्हणून प्रशासनाने कोणाला जबाबदारी दिली होती?
- जबाबदारी असलेल्या यंत्रणेचे लोक दुर्घटना झाली तेव्हा कुठं होते?
- हा पूल दीड वर्षांपूर्वी वापरासाठी बंद केला होता, तर तेंव्हापासून पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही?
- गेल्या दीड वर्षात नवा पूल उभारायला सुरुवात का झाली नाही?
- आता 10 जूनला टेंडर आणि वर्क ऑर्डर काढल्याचा दावा आहे, पण गेली दीड वर्ष हे काम कोणामुळे रेंगाळलं?
GFX OUT

२ विंडो BITE - विक्रम देशमुख, तहसीलदार+ जितेंद्र डुडी, पुणे जिल्हाधिकारी ((
R PUNE TAHSILDAR TT LIVE 160625
+
R ANI PUNE JITENDRA DUDI COLLECTOR 160625))
VO
कुंडमळाला पर्यायी पुलाच्या कामाला वर्षभरापूर्वी 11 जुलैला मंजुरी दिली होती.

सरकारने ८ कोटीच्या निधीची तरतूदही केली होती.

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मावळचे भाजपचे नेते रवींद्र भेगडे यांना तसं पत्राद्वारे कळवलं होतं.

या पर्यायी नव्या पुलाच्या कामाची सुरुवात करण्याचे आदेश 10 जून ला म्हणजे ५ दिवसांपूर्वीच देण्यात आले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पूलाची उभारणी केली जाणार आहे.

मात्र हे काम वर्षभर का लांबलं असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत.

संजय राऊतांनी तर पालकमंत्री अजित पवार यांच्यावरच सगळं खापर फोडलं आहे.
२ विंडो BITE- संजय राऊत
VO
आरोप करण्याच्या नादात राऊतांचं कॅलकुलेशन चुकलं आणि पत्रात ८ कोटींचा उल्लेख असताना ८० हजार मंजूर झाले असा आरोप रेटून नेला. राऊतांच्या सर्व आरोपांना भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उत्तर दिलंय.
३ विंडो BITE- फडणवीस+ प्रफुल पटेल + सरनाईक
R PALGHAR CM LIVE 160625
+
Y:1606GONDIYAPRAFUL PATEL BYTE
+
Y:1606THANEPratap Sarnaik byte
VO
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारला कठोर प्रश्न केले आहेत.
GFX रेडी आहे..
((१
पूल धोकादायक होता, तर पूर्ण प्रवेशबंदी का केली नाही?
२
धोकादायक पूल पाडून नवा पूल का बांधला नाही ?
३
'बचावकार्य वेगानं सुरु आहे' म्हणण्याचा प्रसंग का येतो?
४
सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात?
५
सरकारी विभाग धोकादायक पुलांची तपासणी का करत नाहीत?
६
धोकादायक पुलांची दुरुस्ती किंवा ते बंद करण्याचे नियोजन करता येत नाही का?
७
प्रशासन काही करत नसेल तर सत्ताधाऱ्यांना त्यांच्याकडून कामं करुन घेता येत नाहीत का?
८
सत्ताधाऱ्यांना नक्की कुठला अनुभव आणि त्याचा राज्याला काय उपयोग?))
VO
कुंडमाळा दुर्घटनेत प्रत्येक टप्प्यावर निष्काळजीपणा झाला असं म्हणायला वाव आहे. सरकारने पर्यायी पुलाला मंजुरी दिली, ८ कोटी निधीचं पत्र दिलं पण पुढे वर्षभर त्याचा फॉलोअप घेतला नाही..स्थानिक प्रशासनाने बोर्ड लावून हात झटकले, त्याचं पालन होतंय का, नियम मोडणाऱ्यांवर पोलीस काही कारवाई करतायत का याचा पाठपुरावा केला नाही, काही अतिउत्साही पर्यटक इतर नियम पाळणाऱ्या जबाबदार पर्यटकांसाठी अडचणी निर्माण करतात तेच या ठिकाणी झालेलं प्रथमदर्शनी दिसतंय. या पैकी एकाही ठिकाणी फिल्टर वापरलं गेेलं असतं तर काही निष्पाप जीव वाचले असते. कुंडमाळा प्रकरणात सर्वांनी धडा घेण्याची हीच ती वेळ.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Indrayani River Bridge Accident : इंद्रायणी पूल दुर्घटना, जबाबदारी कोण घेणार? Special Report

TRENDING VIDEOS

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका13 Hour ago

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण23 Hour ago

Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले23 Hour ago

Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.