India vs Australia:ऑस्ट्रेलियात वाट्याला अपयश,रोहित-विराटच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIndia vs Australia:ऑस्ट्रेलियात वाट्याला अपयश,रोहित-विराटच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह Special Report
मेलबर्नच्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला आणि मालिकेत २-१ अशी आघाडीही घेतली. पण या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीविषयी प्रश्न उपस्थित केले जातायत. या दोघांच्या निवृत्तीच्या चर्चाही जोर धरु लागल्या आहेत. पाहूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
भारतीय संघातल्या या दोन्ही दिग्गज
आणि अनुभवी फलंदाजांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली ही कामगिरी
नक्कीच त्यांच्या लौकिकास साजेशी नाही...
पण त्यांच्या या कामगिरीनं आता अनेक प्रश्न उपस्थित केलेयत...
रोहित आणि विराटनं टी२० फॉरमॅटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे
आता या दिग्गजांची कसोटीतूनही निवृत्तीची वेळ जवळ आली आहे का?
मेलबर्नहून सुनंदन लेलेंसह सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई