INDIA Alliance Leadership issues : 'दादा' नको, 'दीदी' हवी? इंडिया आघाडीचा बॉस बदलणार? Special Report
इंडिया आघाडीत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दोन डझन पक्ष आणि नेते आहेत..या आघाडीत सगळेच नेते मोठे.. दिग्गज मानले जाणारे.. प्रत्येकाचीच महत्वाकांक्षा मोठीे... सगळ्यांच्याच मनात दिल्लीच्या तख्ताची आस... त्यात अंतर्विरोध सुद्धा खच्चून भरलेला..त्यामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे हा प्रश्न सुरुवातीपासून यक्ष प्रश्न बनलेला.. आता हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर पुन्हा त्या यक्ष प्रश्नानं डोकं वर काढलंय.. काँग्रेसऐवजी ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व देण्याची चर्चा जोर धरु लागली आहे
भाजपचा रथ रोखण्यासाठी लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीनं दंड थोपटले...
काँग्रेसच्या पुढाकारानं मोदीविरोधकांची मोट बांधली आणि इंडिया आघाडी जन्माला आली...
लोकसभेनंतर सुस्त झालेल्या इंडिया आघाडीला हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर हादरे बसतायत...
त्याचं कारण आहे आघाडीचं नेतृत्व कोण करणारं हे...
काँग्रेसऐवजी ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीचं सारथ्य करण्यात इंटरेस्ट दाखवला...
आघाडीतल्या अनेक पक्षांचा त्यांना पाठिंबा मिळाला आणि राजकारण पेटलं...