Online Fraud | नागपूरमध्ये Bank Fraud, नेटबँकिंगचा नंबर बदलवून एका रात्रीत व्यापाऱ्याचे 26 लाख लुटले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपूर : नागपुरातील नावाजलेल्या व्यापाऱ्याचा बँकेशी जोडलेला मोबाईल क्रमांक एका भामट्याने व्यापाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून बदलून घेतला. बँकेनेही काळजी न घेता व्यापाऱ्याच्या नेट बँकिंगचा नंबर बदलून टाकला. त्या भामट्याने एका रात्रीत व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून 26 लाख 50 हजार रुपये इतर बँक खात्यात वळते करत व्यापाऱ्याला अक्षरश: रस्त्यावर आणले. मात्र, नागपूर पोलिसांच्या सायबर सेल ने मेहनत घेत व्यापाऱ्याचा एक न एक रुपया त्याला परत मिळवून दिला आहे.त्यामुळे आर्थिक गुन्ह्यात वेळेत तक्रार नोंदविली आणि पोलिसांनी योग्य पाठपुरावा केला तर संपूर्ण रक्कम मिळू शकते हे अधोरेखित झाले आहे.