Haryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहरियाणात यंदा भाजपला धक्का बसणार, असे अंदाज अनेकांनी वर्तवले होते... एक्झिट पोलचे दावेही तसेच होते... मात्र या सगळ्यांना खोटं ठरवत, हरियाणातील जनतेने विजयाचा गुलाल भाजपच्याच कपाळी लावला... आता या निकालाचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर, काय परिणाम होणार? याकडे सगळ्यांचे डोळे लागलेयत... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
सरकारविरोधी लाट, एक्झिट पोलचे सर्व दावे खोटे ठरवत हरियाणात भाजपनं हॅटट्रिक केलीय...
हरियाणात भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे...
गेल्यावेळच्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ झालीय...
काँग्रेसनंही गेल्यावेळच्या तुलनेत जास्त जागा जिंकल्या...
पण विजयाचं गणित काँग्रेसला साध्य झालं नाही...
शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे भाजपची वाट खडतर मानली जात होती...
पण भाजपनं खडतर विजय शक्य करून दाखवला...
भाजपच्या यशाची कारणं काय आहेत ते पाहुयात...
महाराष्ट्रातल्या मराठा समाजासारखाच हरियाणाच्या राजकारणात जाट समाजाचा प्रभाव आहे.
हरियाणात २५ टक्के जाट, तर ७५ टक्के बिगर जाट लोकसंख्या आहे.
जाट मतांचा फटका बसणार हे लक्षात घेऊन भाजपनं ७५ टक्के बिगर जाट मतांवर लक्ष केंद्रित केलं.
ओबीसींसह मागासवर्गीय जातींना भाजपनं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं स्वत:कडे ओढलं.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं नायबसिंह सैनी हा ओबीसी चेहरा मुख्यमंत्रिपदी दिला.
मनोहरलाल खट्टर यांच्याविरोधातली नाराजी लक्षात घेऊन त्यांची उचलबांगडी केली.
सरकारविरोधी लाटेची शक्यता लक्षात घेऊन भाजपनं ६० टक्के नवीन उमेदवार दिले.
जानेवारीपासूनच प्रचाराला सुरुवात करून सरकारच्या योजना लोंकापर्यंत पोहोचवल्या.
काँग्रेस आणि आप स्वतंत्र लढल्यामुळे मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला.
काँग्रेसनं ७० प्रचारसभा घेतल्या, तर भाजनं १५० प्रचारसभांचा धडाका लावला.
भाजपच्या हरियाणातल्या या विजयाचा जल्लोष महाराष्ट्रात होतोय...
महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तोंडावर हरियाणात मिळालेल्या घवघवीत यशामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय...
पण भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिलीय...
दुसरीकडे हरियाणातल्या पराभावसोबतच काँग्रेसच्या जम्मू काश्मीरमधल्या जागा २०१४ च्या तुलनेत निम्म्यानं घटल्यात...
त्यामुळे महाराष्ट्रात जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेशी स्पर्धा करणाऱ्या काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होणार का याची चर्चा सुरू झालीय..
या निकालाची संधी साधत ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियका चतुर्वेदींनी काँग्रेसला टोला लगावलाय...