अनुसूचित जातीतील दहावीच्या विद्यार्थ्यांना 90 टक्क्याहून अधिक गुण मिळाल्यास 2 लाखांचे अनुदान!
गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड
Updated at:
24 Jun 2021 10:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.